काही दिवसांअगोदर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीले होते. रत्नागिरी-राजापुर येथील नाणार रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातच आणि त्यातल्यात्यात कोकणातच व्हावा अशी भूमिका राज ठाकरे यांनी या पत्रातून घेतली होती. शरद पवार यांचे या भूमिकेस समर्थन असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
नाणार प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कोकणातील तरुणांचे वाढते बेरोजगारीचे प्रमाण तसेच कोकणाचा एकांगिक सर्वाधिक विकास आणि कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या आर्थक गाड्याला चालना देण्यासाठी नाणार प्रकल्प महत्वाची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पास राज्य सरकारने परवानगी द्यावी असे पत्र राज ठाकरे यांनी ऊद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांना पाठवले होते. यावर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या या भुमिकेचे स्वागत केले होते. शरद पवार हे देखील आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ असल्याचे त्यांनी नाणारवासियांना सांगीतले होते.
राज ठाकरेंच्या या पत्रानंतर काही नाणारवासियांनी सोमवारी राज ठाकरेंची भेट घेतली. शरद पवार यांनी फोन करुन भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे, असे राज ठाकरेंनी ऊपस्थितांना सांगीतले.
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांचा प्रचंड विरोध होता. हा विरोध बघताच राज्याचे उद्योगमंत्री तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाची परवानगी रद्द केली होती. मात्र प्रकल्प त्याचठिकाणी व्हावा अशी मागणी राज ठाकरे यांच्या पत्रानंतर पुन्हा जोर धरु लागली आहे.