शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले : थोरात

11

कॉंग्रेस पक्षाचा कायम होणारा पराभव हा काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी मध्ये सातत्याचा थोडा अभाव असल्याचं म्हणत परखड मत व्यक्त केलं होतं.

कोणत्याही पक्षामध्ये नेतृत्वाची मान्यता पक्षातील लोकांमध्ये किती आहे, हे पाहणे महत्त्वाचे असते. आज काँग्रेसमध्ये रँक अँड फ्रँकटी स्थिती लक्षात घेतदली तर आजही गांधी-नेहरू परिवाराबाबतची आस्था काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पाहण्यास मिळत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी हे दोघेही त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे बरेच नेते हे त्यांच्या विचारांचे आहेत आणि वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे. असे शरद पवार यांनी मत व्यक्त केले होते.

यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले. अशी प्रतिक्रया काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करतील. असे थोरात म्हणाले.