कृषी कायद्यांबाबत शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली आहे: कृषीमंत्री तोमर

9

शरद पवार यांनी शनिवारी मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषीमंत्री असताना कायद्यात सुचवलेले बदल यांची तुलनात्मक समिक्षा केली होती.

पण शरद पवारांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे, असं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार हे अनुभवी राजकीय नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री आहेत. त्यांना कृषी क्षेत्रातील प्रश्नांची आणि त्यावरील तोडग्यांची चांगली जाण आहे. त्यांनी स्वतः कृषी सुधारणा घडवून आणण्यासाठी कठोर प्रयत्न केले आहेत. मला वाटलं होतं की त्यांच्याकडे तथ्यांबाबत चुकीची माहिती होती. मात्र, आता त्यांच्याकडे खरी माहिती आहे. मला आशा आहे की ते आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील,” असं नरेंद्र सिंह तोमर म्हणाले.

शरद पवार यांनी बाजार समित्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना तोमर म्हणाले, नव्या सुधारणांमध्ये बाजार समित्यांवर परिणाम होणार नाही. उलट नव्या सुधारणांमुळे सेवा आणि सुविधांबाबत त्या अधिक स्पर्धात्मक आणि किफायतशीर होतील.

आपल्या राज्याबाहेरही त्यांना माल विकता येणार असून त्याबदल्यात त्यांना चांगली किंमतही मिळेल. मात्र, याचा परिणाम किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर होणार नाही, असं तोमर म्हणाले.