शेतकऱ्यांसाठी आता शरद पवार मैदानात; राष्ट्रपतींची भेट घेणार

25

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायद्याविरोधात दिल्ली बॉर्डरवर मोठं शेतकरी आंदोलन सुरू आहे. आज्या शेतकरी आंदोलनाचा दहावा दिवस असून अजूनही शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर तोडगा निघालेला नाही. काल शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात पाचवी चर्चा फेरी पार पडली. मात्र या चर्चेतून काहीही निष्पन्न झालेले नाही. शेतकऱ्यांना फक्त हे कायदे मागे घेणार की नाही या एक शब्दात उत्तर केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे.

एकीकडे केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू असताना दुसरीकडे आंदोलन अधिक आक्रमक होताना पाहायला मिळतय. आता हे आंदोलन फक्त दिल्लीपुरते मर्यादित राहणार नाही. देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील. त्यामुळे सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भेट घेणार असल्याची माहिती आहे. शरद पवार राष्ट्रपतींशी कृषी कायद्यांविषयी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार देखील मैदानात उतरल्याचे पाहायला मिळते आहे.