महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.
राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचही ते म्हणाले. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
त्यांना दोन महिन्यात सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केलं आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल, असं पवार म्हणाले.