“शरद पवार जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे असा इतिहास लिहिला जाईल” : सदाभाऊ खोत

12

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते एकवटले आहेत. देशभरातून या आंदोलनाला मोठं समर्थन मिळत आहे. सोबतच सदरील कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी कायद्यांना समर्थनार्थ किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा केली. यावेळी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर सडकून टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केलीय. शरद पवार तुम्ही जास्त खोट बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात, असं टीकास्त्र सदाभाऊ खोतांनी सोडलंय.

पवार साहेबांचे मनावर घेऊ नका. ते नेहमी उलटे बोलतात. जेव्हा ते बोलतात सूर्य इकडून उगवेल तेव्हा नेमका तो दुसऱ्या बाजूने उगवत असतो. शरद पवार यांनी आत्मचरित्रातही तसे लिहून ठेवले आहे, अशी टीकाही सदाभाऊ यांनी केलीय. मार्केट कमिटीत मालाच्या विक्रीसंदर्भात हे विरोध करतात आणि मात्र हेच शरद पवार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतात, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर टीका केलीय.