सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यावरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकार लसींचा पुरवठा करण्यास दुजाभाव करत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. तर कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार भिती पसरवते आहे असे केंद्र सरकारने म्हटले. यादरम्यानच शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाच्या नविन निर्बंधांच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. कालच माझे केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याशी बोलणे झाले आहे. केंद्र सरकार आणि केंद्राचं आरोग्य खातं हे देशातील प्रत्येक राज्याच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी आहे असा विश्वास त्यांनी यावेळी दिला असल्ताचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारची मदत आणि आपला सामुहीक प्रयत्न यांद्वारे आपल्याला यातुन मार्ग काढायचा आहे असे शरद पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात लसींचा तुटवडा आहे. केंद्राकडून लस पुरवठा होतो आहे. मात्र त्यास वेग देण्याची आवश्यकता असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते.
यावरुनच केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी राजेश टोपे यांच्यावर टीका केली आहे. प्रत्येक राज्याका सुरळीतपणे कस पुरवली जात आहे. त्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महाराष्ट्र सरकार स्वत:चे अपयश झाकण्यासाठी लोकांचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले होते.