शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर एन्जोप्लास्टी सर्जरी झाल्यानंतर त्यांना लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी अजित पवार आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.
गेल्या वर्षी संजय राऊत यांच्यावर हृदयात दोन स्टेन घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी स्टेन टाकावे लागणार होते. त्यासाठी एप्रिल २०२० ही नियोजित वेळ होती. पण कोव्हिड प्रादुर्भावामुळे ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
अखेर संजय राऊत यांच्यावर बुधवारी लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी दोन स्टेन त्यांच्या हृदयात टाकण्यात आल्या, असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.