पवार पॅटर्न अमेरिकेत जारी! ज्यो बायडन यांचीही गाजली पावसातील सभा

19

सातारा लोकसभा मतदार संघात श्रीनिवास पाटील यांच्या प्रचार सभेत शरद पवारांनी केलेल्या भाषणाला नुकतीच वर्षपुर्ती झाली. यांची साताऱ्यातील सभा प्रचंड गाजली होती. याच पार्श्वभुमीवर उदयनराजेंचा मोठा पराभव झाला. शरद पवारांची ती सभा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. ’80’ वर्षाचा योद्धा अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. भाषण सुरू असताना मुसळधार पाऊस सुरू झाला कसलीही पर्वा न करता त्यांनी पावसात उभा राहून भाषण पूर्ण केले. उपस्थितांनी देखील टाळ्यांचा कडकडाटात त्यांना दाद दिली होती.

अमेरिकेत सध्या निवडणुकीचा कालावधी सुरू आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी ज्यो बायडन यांची पावसातही सभा पवारांप्रमाणेच अत्यंत गाजत आहे. अमेरिकेचं विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी चांगलाच जोर लावल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान बायडन यांचे भाषण सुरू असताना जोरदार पाऊस झाला, मात्र बायडन यांनी पावसात उभा राहून भाषण केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. ज्यो बायडन यांच्या या पावसातील सभेमुळे अत्यंत चर्चेत आले आहेत. जगाला दिशा दाखवणारे एकच नाव ‘साहेब’ अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.