युपीएचे नेतृत्व शरद पवार‍ांनी करावे, कॉंग्रेसची भूमिका

11

सत्तेत असणार्‍या भाजपप्रणीत एनडीएसमोर युपीएला मजबुत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. यावर
च युपीएचे नेतृत्व आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे असे विधान शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केले. संजय राऊतांच्या या विधानामुळे कॉंग्रेस गटात नाराजी असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यावर स्पष्टीकरण देत‍ांना ही कॉंग्रेसचीच भूमिका असल्याचे संजय राऊत म्हणाले. दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते.

केंद्रात विरोधी पक्षाला बळकटी देण्याची वेळ आली आहे. भाजपच्या एनडीसमोर आव्हान निर्माण करायचे असल्यास युपीएला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. कॉंग्रेस पक्षामधील जेष्ठ नेत्यांनासुद्धा हे जाणवते आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही जवाबदारी लीलया पार पाडली. मात्र आता कॉंग्रेसच्या बाहेरील व्यक्तीस ही जवाबदारी देण्याची वेळ आहे. असेसुद्धा संजय राउत यावेळी म्हणाले.

संजय राऊतांच्या या विधानामुळे कॉंग्रेस पक्षात नाराजी असल्याचा सुर होता. मात्र संजय राऊतांनी या सर्व बाबी चुकीच्या आणि बिनबुडाच्या असल्याचे स्पष्ट केले. कॉंग्रेस पक्षात कसलीही नाराजी वगैरे नसून कॉंग्रेसमधील जेष्ठ नेत्यांचीच ही ईच्छा असल्याची ते यावेळी म्हणाले.

परमबीर सिंह पत्र प्रकरणावरुन संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा यावेळी टीका केली. विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिष्ठा कमी होईल असे कुठलेही वर्तन विरोधी पक्षनेत्यांनी करु नते असे ते म्हणाले. तसेच परमबीर सिंह प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचा ऊल्लेखसुद्धा त्यांनी यावेळी केला.