शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं : किरीट सोमय्या

0

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात वाझेंना वाचवण्याचा देशमुख यांनी प्रयत्न केला. वाझेंवर कारवाई करण्यात दिरंगाई केली. त्यामुळे देशमुख यांची पवारांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

अँटालिया आणि हिरेन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे अधिकारी त्यात गुंतले होते. पुरावा कसा नष्ट करायचा हे त्यांना माहीत होतं. पण या अधिकाऱ्यांना कोण ऑपरेट करत होते हे माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हिरेन कुटुंबीयांच्या मनात अजूनही भीतीचं वातावरण आहे. मात्र, एनआयए तपास करत असल्याने त्यांचा या तपासावर विश्वास आहे, असंही त्यांनी सांगितलं.