शरद पवार पंतप्रधान होणार ? यूपीए मध्ये मिळणार मोठी जबाबदारी

11

देशात कृषी कायद्या विरोधात वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकारला नामवण्यासाठी एकजूट होण्याचे प्रयत्न चालवले आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

विरोधी पक्षांनी पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठे फेरबदल करण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षांची सूत्रे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता युपीएमधील काही नेत्यांनी वर्तवली आहे. शरद पवार, खा. राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधी पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ शेतकरी आंदोलन प्रश्नी राष्ट्रपतींच्या भेटीला गेलं होतं.

शरद पवार यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय तयार करण्याचं काम विरोधी पक्षांकडून सुरू आहे. शरद पवार यांना एकमताने पंतप्रधानपदाच्या पदासाठी समोर आणलं जाऊ शकतं. असं झाल्यास शरद पवार हे यूपीए चे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात.

विरोधी पक्ष शरद पवार यांच्याकडे युपीएच्या प्रमुख पदाची म्हणजेच देशातील विरोधी पक्षनेत्याची सूत्रे हाती देण्यात येणार आहेत. त्यामुळेच आता महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेसला देखील पंतप्रधान पदाची संधी मिळू शकेल. सध्या युपीएची सूत्रे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. तर, काँग्रेसमधील काही नेते आता शरद पवार यांच्या नावाची शिफारस करत असल्याचे वृत्त आहे.