प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत असतात. त्याच्याच एक दिवस आधी पवार हे शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनाची दखल घ्यावी, यासाठीची पवारांची ही खेळी असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.
शरद पवार शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यास ती आपोआपच राष्ट्रीय बातमी होणार आहे. दिवसभर सर्व मीडियात आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात या बातमीला ठळक स्थान मिळेल.केंद्राने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. या पार्श्वभूमीवर पवार आंदोलनात सहभागी झाल्यास शेतकरी आंदोलनाला आणखी हवा मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे.आंदोलनात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार आहेत, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.