राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित केले गेले होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री, नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब यांना रविवारी सायंकाळी पोटदुखीमुळे अस्वस्थ वाटत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांच्या पित्ताशयात दोष निर्माण झाल्याचे निदान झाले आहे.
पवार साहेबांवर ३१ मार्चला एंडोस्कोपी नंतर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.