संजय राऊत यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला
कोरोनाविषयी त्यामध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. तरच देशातल्या परिस्थितीचे आकलन होईल. सरकार आणि विरोधी पक्ष महत्वाचे नसून जनतेचे हित महत्वाचे आहे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.
कोरोनाचा संसर्ग वाढला असून आता लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. याबाबत शरद पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. कोरोना संदर्भात शरद पवार चिंताग्रस्त आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.