खडसेंच्या पक्षांतरानंतर शरद पवारांचा पहिलाचं उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द

2

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार होते. भाजप पक्षातुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार 20 आणि 21 नोव्हेंम्बरला पहिल्यांदाचं उत्तर महाराष्ट्रात दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जय्यत तयारीला सुरवात झाली अशी माहिती मिळाली होती. खडसेंनी काही दिवसांतचं भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत आणले आहे. त्यानंतर आता शरद पवार खान्देशात राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी सज्ज झाले आहेत.

या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व असल्याचं समजलं जात आहे. शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंम्बरला धुळ्यासह नंदुरबारला देखील जाणार होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रोहिणी खडसे यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रातला दौरा हा काही वेळासाठी रद्द करण्यात आला आहे.