भाजपच्या नेत्याचा राजकीय गौप्यस्फोट, ममता बॅनर्जी यांच्या विजयामागे शरद पवारांचे अदृश्य हात

9

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल काल रात्री जाहीर झाले. केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपला तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी धूळ चारली आहे. तृणमुल काँग्रेस पुन्हा एकदा बंगालच्या सत्तेवर बसणार हे निश्चित झालं आहे.

भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयमागे शरद पवार यांचा हात आहे. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

भाजपचे निवडणूक प्रभारी असलेल्या कैलास विजयवर्गीय यांनी हा गौप्यस्फोट केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्यानं मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय, असं विजयवर्गी यांनी म्हटल्याचा हवाला जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

वरील सर्व प्रकरणावरून विजयवर्गी यांनी केलेल्या विधानाचा विचार केल्यास पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता. असे म्हणता येईल.