राज्याचे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे केलेलं सत्तास्थापन चूकच होतं असा निर्वाळा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते लोकसत्ता वृत्तपत्राच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
अजित पवार यांच्यासह सरकार स्थापन केल्याचा पश्चाताप होत नाही. पण असं सरकार स्थापन करायला नको होतं. ती चूकच होती. शंभर टक्के सांगतो. ती चूकच होती. पण त्याचा पश्चाताप होत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नांना बेधडक उत्तरे दिली. अजित पवार यांच्यासोबत भल्या पहाटे सरकार स्थापन करण्यावर त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ‘त्या गोष्टीचा पश्चाताप होत नाही, पण एवढंच सांगतो असं सरकार करायला नको होतं, ही चूक आहे. शंभर टक्के सांगतो ही चूक असली तरी पश्चाताप होत नाही. असे फडणवीस म्हणाले.