‘ती’ बनणार उत्तराखंडची एका दिवसाची मुख्यमंत्री; विधानसभेला करणार संबोधित

45

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा ‘नायक’ चांगलाच गाजला होता. एक आदर्श मुख्यमंत्री कसा असावा, यावर आधारित हा चित्रपट होता. वृत्तवाहिनेचा कॅमेरामन, मुलाखतकार, एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो अशी या चित्रपटाची कथा आहे. उत्तराखंडमध्ये देखील अशाच प्रकारची घडली आहे. हरिद्वारच्या दौलतपूर गावातील सृष्टी गोस्वामी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री बनणार आहे.

एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीला उत्तराखंडची एका दिवसाची मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळत आहे. तिला आता एक दिवसाची मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळणार आहे. येत्या 24 जानेवारी रोजी ‘बालिका दिवस’ आहे. यानिमित्ताने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एका हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उत्तराखंडच्या बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी याबाबत मुख्य सचिव ओमप्रकाश यांना पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री सृष्टी गोस्वामी उत्तराखंडच्या विभागीय कार्यालयाच्या कामाचा आढावा घेणार आहे. त्यासाठी विभागाचे अधिकारी आपल्या कार्याचा अहवाल ५ मिनिटं बाल विधानसभेत देतील. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत बाल विधानसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी, मुलांची असेंब्ली असेंब्लीच्या कक्ष क्रमांक 120 मध्ये होईल. ज्यामध्ये एक डझन विभाग आपले सादरीकरण देतील.

सृष्टी गोस्वामीने यासाठी तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. तिने या पदासाठी माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले आहेत. या निवडीबद्दल सृष्टीच्या आई-वडिलांनी सांगितले की, आम्हाला अभिमान वाटतो, मुलीला साथ दिली तर ती यशाचं शिखर नक्की जिंकते, आम्ही उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो असं त्यांनी म्हटलं आहे. असे संपूर्ण देशात पहिल्यांदाच होत आहे की, एका दिवसाची का होईना माझी मुलगी मुख्यमंत्री होणार आहे.