शेहला रशीद देशविरोधी कारवायांमध्ये सामील, माझ्या जीवाला धोका- वडिल अब्दुल रशीद

2

जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीद पुन्हा एकदा वादात अडकली आहे. यावेळी खुद्द तिचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनीच तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेहला देश विरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात शेहला रशीदच्या वडिलांनी जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) पत्रही लिहिले आहे. यात म्हणण्यात आले आहे, की त्यांची मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. एवढेच नाही तर मुली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

शेहला रशीदच्या वडिलांनी आरोप करत दावा केला आहे, की शेहलाला परदेशातून तीन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. व्यापारी जहूर अमहद शाह वटालीने शेहलाला जेकेपीएम पार्टीत सामील होण्यासाठी 3 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शेहला वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर यापूर्वीही ती अनेक वेळा वादात सापडली आहे.