बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर या कोरोनाची लस घेणाऱ्या भारताच्या पहिल्या सेलिब्रिटी ठरल्या आहेत. त्यांनी कोरोना लस दुबईमध्ये घेतली आहे. सोशल मिडियाच्या माध्यामातून शिल्पा शिरोडकर यांनी चाहत्यांनी ही माहिती दिली आहे. देशात येत्या काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे. पण, यातही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही लस केव्हा पोहोचणार याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. अशी परिस्थिती असतानाच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत आपण लस घेतल्याचं जाहीर केलं.
शिल्पा शिरोडकर यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या हातावर एक पट्टी बांधण्यात आली आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लसी घेऊनही मी सुरक्षित आहे. हे न्यू नॉर्मल आहे. धन्यवाद यूएई. शिल्पा शिरोडकारांचा हा फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच कमेंट बॉक्समधूनही कौतुक केले जात आहे.
शिल्पा शिरोडकर ही माजी मिस इंडिया नम्रता शिरोडकर हिची मोठी बहीण आहे. नम्रताचा विवाह महेश बाबू याच्याशी झाला आहे तर शिल्पाचा विवाह बँकर अपरेश रंजीतशी झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. शिल्पा ही सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि नेहमी स्वतःचे फोटो शेअर करत ती स्वतःबद्दल लिहिते. इन्स्टाग्रामवर तिचे ६४ हजारापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
शिल्पाला दुबईमध्ये लसीकरण करण्यात आले आहे. ती लग्नानंतर काही काळ भारतात राहिली होती. त्यानंतर ती दुबईला गेली. शिल्पाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की २००० मध्ये तिचं लग्न झालं. त्यानंतर तो आणि मी पाच वर्ष लाँग डिस्टंन्समध्ये राहिलो. त्यानंतर ती पुन्हा दुबईला गेली. तिथे कुटुंबासोबत राहते. शिल्पा शिरोडकर लवकरंच मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.