शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊ शकत नाही! असे का म्हणाले संजय राऊत?

6

सचिन वाझे प्रकरण रोज नवनविन वळण घेत आहे. सचिन वाझे यांच्या स्वहस्ते लिखित पत्र व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये महाविकासआघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांचेसुद्धा नाव घेण्यात आले आहे. अनिल परब यांनीसुद्धा मला वसुली करण्याचे आदेश दिले होते असे पत्रात नमुद आहे. मात्र अनिल परब यांनी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहे. यावरच शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ कधीच घेऊ शकत नाही असे म्हणत अनिल परब यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची पाठराखन करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला आहे.

सचिन वाझे यांच्या त्या पत्रामध्ये त्यांच्या पुनर्नियुक्तीपासून संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला आहे. यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच अनिल परब यांच्यावरसुद्धा आरोप करण्यात आले आहे. मात्र हा मला आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा कट आहे. माझा सचिन वाझेंशी कुठलाही संबंद्ध नाही. माझ्यावर हेतुपुरस्पर आरोप करण्यात आले आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेउन मी सांगतो याप्रकरणाशी माझा कुठलाही संबंद्ध नाही. शिवसेना खा. संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखन केली आहे.

“कुठलाही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊ शकत नाही. राज्य सरकारला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी ज्याप्रकारचे राजकारण केले जात आहे एवढे नीच राजकारण यापुर्वी या देशात कधीही झाले नाही.” असेसुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत.