न्यायनगर हुसैन कॉलनी भागात विधानपरिषद आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष आमदार निधीतून 50 लाख रुपयांतून बनवण्यात येणाऱ्या सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आमदार आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार विकासकामे करत असतांना शिवसेना कधीच कोणाची जात, धर्म मुळीच बघत नाही, मतदान होईल का नाही हे बघत नाही तर जनतेची आवश्यकता बघतो. असे अंबादास दानवे म्हणाले.
न्यायनगर हुसैन कॉलनी 100% मुस्लिम भाग असला तरी एक सामाजिक, विकासात्मक भावनेतून सर्व घटकाला पुढे नेत शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा हेतू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, शहरसंघटक राजू वैद्य, मा नगरसेवक गजानन मनगटे यांच्यासह नागरीक पदाधिकारी उपस्थित होते.