‘सत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करू शकत नाही’ : मनसे नेता

22

मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, अजूनही संभाजीनगर नावाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे.

काल सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने औरंगाबादमधील विमानतळाला छत्रपती संभाजी राजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

देशपांडे म्हणाले की, सत्तेची लाचारी सोडल्याशिवाय शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही. औरंगाबादचं नामांतर करण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसची मदत लागेल आणि काँग्रेसचा नामांतराला विरोध आहे. राज्य सरकारने विमानतळाला छत्रपती संभाजीराजेंचे नाव देण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. मात्र विमानतळाचं नाव कसलं बदलता आधी शहराचं नाव बदलून दाखवा, असे आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले आहे.