शिवसेना जिल्हाप्रमुखांची नवीन आमदार लाड आणि आसगावकरांबद्दल खंत

14

कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल मध्ये पुणे पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अरुण लाड व शिक्षक मतदार संघाचे आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांचा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.ते आमदार झाले. याचा मला आनंद आहे. मात्र या दोन्ही आमदारांनी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला फोन केला नाही अशी खंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, दादासाहेब लाड, भैय्या माने, बाबासाहेब देवकर, राजेश पाटील, दिनकर जाधव, भरत रसाळे उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना विजय करण्यामध्ये आपल्या सर्वांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न केल्यामुळे हे दोन्ही होतकरू आमदार पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाला मिळाले आहेत. निश्चितपणे हे दोघेही आपले कर्तृत्व दाखवतील.