‘शिवसेना शरद पवारांच्या चरणी लीन झाली’, प्रवीण दरेकरांचा घणाघात

6

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. शिवसेनाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे. असा टोला प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला लगावला. हिंदुत्व सोडून शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली तेव्हाच त्यांचे हिंदुत्व विषयीचे विचार आणि आचार कळाले. असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

केंद्राने आणलेल्या कृषी कायद्याचे समर्थन करत असताना दरेकर यांनी अन्य पक्षांना खडे बोल सुनावले. आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झालेल्या पक्षांना शेतकऱ्यांचा पुळका नाही. तो स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेना इतिहास विसरत चालली आहे. बाळासाहेबांनी काय केलं हे देखील ते विसरत आहेत. असं म्हणत त्यांनी सेनेवर हल्लाबोल केला.

विरोधकांचा आजचा बंद शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत. कुणाला दाखवण्याची गरज नाही. असा निर्वाळा प्रवीण दरेकर यांनी दिलाय.