गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून संजय राऊत वेळोवेळी सूचना देत आहेत. संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असं म्हटलं होतं.
या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय योग्य प्रकारे हाताळता येतात. तसेच काँग्रेस पक्ष देशाला योग्य दिशा देऊ शकतो, असं काँग्रेस नेते नसीम खान यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी संजय राऊत यांना सुनावलं आहे.
युपीएच्या अध्यक्ष पदावरुन शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे की, अध्यक्ष बदलण्याची कुठलीही चर्चा किंवा परिस्थिती सध्या नाही. त्यामुळे यावर शिवसेने आपली प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
महाराष्ट्रात कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत काँग्रेसने शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे. हे त्यांनी यूपीएचा भाग नसल्यामुळे या संदर्भात कुठलेही भाष्य करणे गरजेचे नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.