मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेली कार प्रकरणातील तपासात एनआयए दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे करते आहे. याप्रकरणी संशयाच्या भोवर्यात असलेले आणि एनआयएच्या ताब्यात असलेले एपीआय सचिन वाझे यांच्या अडचणींत वाढच होते आहे. भाजप सुरुवातीपासून याप्रकरणाला शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न करते आहे. अंबानी यांना घाबरवुन शिवसेना पक्षासाठी निधी गोळा करते आहे का? असा प्रश्न करत अप्रत्यक्षरित्या मुंबईतील भाजपचे आ. राम कदम यांनी थेट शिवसेनेवर आरोप केले आहे.
भाजपचे आ. राम कदम यांनी याप्रकरणी अनेक प्रश्न ऊपस्थित केले आहेत. राज्य सरकार एपीआय सचिन वाझेंना पाठीशी का घालते आहे? एखाद्या गंभीर संशयित असणार्यास असं पाठीशी घालणं योग्य आहे का? अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके का ठेवण्यात आले? सचिन वाझे एवढ्या मोठ्या षड्यंत्रात एकटेच सहभागी होते का? अशाप्रकारे शिवसेना निवडणुकीसाठी पैसे गोळा करते आहे का? यादिशेन तपास व्हावा ही आमची मागणी आहे असे राम कदम यांवेळी म्हणाले.
आणखी वाचा….शरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावं : किरीट सोमय्या
भाजपने सुरुवातीपासून याप्रकरणाशी शिवसेनेला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचेकडूनसुद्धा सचिन वाझे यांे वारंवार कौतुक होते आहे. तसेच अर्णब गोस्वामी यांना घरातून अटक करणार्या पथकाचे नेतृत्व सचिम वाझेंनी केले होते. त्यामुळे त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेसुद्धा महाविकासआघाडीतील नेत्यांकडून बोलले जाते आहे.
न्यायालयाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंतची एनआयए कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान एनआयएने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. याप्रकरणी आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता एनआयएच्या अधिकार्यांनी वर्तवली आहे.