शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे : उदय सामंत

15

मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी तेथील ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. सरकारने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प हातातून गमावू नये, असे म्हटले आहे.

त्यावरून नाणार प्रकल्प नको, अशीच स्थानिकांची भूमिका आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. 

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. नाणार प्रकल्पाची गोष्ट शिवसेनेसाठी संपली आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनावर आधारित प्रकल्प येतील. या माध्यमातून कोकणातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील. मात्र नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.