‘आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे, राष्ट्रवादीचे प्रगल्भ नेते निर्णय घेतील’ : शिवसेना नेते

241

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रेणू शर्मा नामक महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सदरील तक्रारीबाबत स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत स्पष्टीकरण दिलं आहे. या फेसबुक पोस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे धनंजय मुंडे यांनी केल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत म्हणाले…
धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीचे नेतेच ठरवतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची पाठराखण केली होती, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधले.‘राजकारणात शिखरावर जाण्यासाठी कष्ट करावे लागतात, आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे’असे संजय राऊत म्हणाले.