नुकताच राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अर्थसंकल्पावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. विरोधकांनी नाराजीचा सुर ऊमटवला आहे, तर सत्ताधार्यांकडून अर्थसंकल्पाचे कौतुक केले जात आहे. यावरच आता शिवसेनेचे अामदार तसेच माजी परवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाकर रावतेंच्या बोलण्यात मात्र नाराजीचा सुर जाणवत होता.
मराठी विद्यापीठ हा शिवसेनेचा अग्रणी मुद्दा आहे महाविकासआघाडी सरकारच्या कार्यक्रमपत्रकावरसुद्धा मराठी विद्यापिठाचा विषय आहे. तसेच राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. एवढे असूनही अर्थसंकल्पात याकरिता तरतुद का करण्यात आलेली नाही? असा सवाल त्यांनी ऊपस्थित केला आहे.
मृत्युनंतर वर शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे भेटतील, तू काय करुन आलास असे विचारतील, तेव्हा त्यांना मी काय ऊत्तर देऊ? अशी उद्वीग्न प्रतिक्रियासुद्धा दिवाकर रावते यांनी यावेळी दिली. दिवाकर रावतेंच्या या प्रतिक्रियेमुळे आता राजकीत वर्तुळात चर्चा रंगत आहेत.