शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी यादी जाहीर; ‘हे’ आहेत शिवसेनेचे नवे स्टार प्रवक्ते

155

शिवसेनेच्या नवनिर्वाचित प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आपल्या शैलीने पक्षाची भूमिका निर्भिडपणे मांडणारे, सामनाचे संपादक, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची शिवसेनेच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांनी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामधे अनेक दिग्गज शिवसेना नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
मुख्य प्रवक्त्यांबरोबरच अन्य प्रवक्त्यांनी निवडही करण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्तेसंजय राऊत, अरविंद सावंत हे शिवसेनेचे असतील तर, अन्य प्रवक्ते पुढीलप्रमाणे…
१) प्रियांका चतुर्वेदी ( राज्यसभा खासदार )
२) अनिल परब ( परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य )
३) सचिन अहिर ( शिवसेना उपनेते )
४) सुनील प्रभू ( आमदार, मुंबई )
५) प्रताप सरनाईक ( आमदार, ठाणे )
६) भास्कर जाधव ( आमदार, रत्नागिरी )
७) अमदास दानवे ( आमदार, विधानपरिषद )
८) मनीषा कायंदे ( आमदार, विधानपरिषद )
९) किशोरी पेडणेकर ( महापौर, मुंबई )
१०) शीतल म्हात्रे ( नगरसेविका, मुंबई )
११) शुभा राऊळ ( माजी महापौर, मुंबई )
१२) किशोर कान्हेरे
१३) संजना घाडी
१४) आनंद दुबे