शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे: नितेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा

30

शिवसेनेला लागोपाठ आलेल्या ईडीच्या नोटीसांमुळे आक्रमक पवित्रा घेतला असून, शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे वृत्त आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या या शक्तीप्रदर्शनावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे. हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही. पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?,” असे म्हणत नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे.

ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यांची चौकशी ५ जानेवारी रोजी होणार असून, शिवसेनेकडून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे वृत्त आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईसह जवळच्या शहर परिसरातून शिवसैनिक येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.