शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही; भाजप शिवसेनेबरोबर जाणार ?

167

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारी आणखी एक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराच काळ चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या चर्चेत नेमकं काय घडलं, कशाबाबत ही चर्चा झाली याची माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

‘भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली’, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

‘आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी भेटीबाबत भाष्य केल्याने राजकीय जाणकार संभ्रमात पडले आहेत.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत, ते सोनिया गांधींच्या दबावाखाली येणार नाहीत, कधीकाळी युतीमध्ये सडलो, म्हणत युती तोडली, पण नंतर परत सोबत आले, आता पुढे बघू, असं मुनगंटीवार म्हणाल्यामुळे भाजपच्या शिवसेने बरोबर येण्याच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्याचं चित्र आहे.