मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करत आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे शिवसेना तसेच ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जातोय, असे शिवसेनेला वाटत आहे. सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यासाठी शिवसेनेची चाचपणी सुरु असल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
किरीट सोमय्या यांनी 8 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महाकाली मातेला विकण्यासाठी आणि या गुफा बिल्डर्सला दान करण्यासाठी ही कालमर्यादा 999 वर्षे केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळ त्यांनी याबाबतचे सर्व पुरावे असल्याचाही दावा केला होता.सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाकरे कुटुंबावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आणखी एका भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.रस्त्याच्या बदल्यात उद्योगपती विनोद गोयंका, शाहिद बलवा आणि अविनाश भोसले यांच्या कंपनीला 74 कोटी रुपयांची भरपाई देण्याचा घाट घातला जात आहे. हा एक मोठा घोटाळा आहे”, असा दावा त्यांनी काही दिवसांपूर्वी केलाय.
त्यांच्या या आरोपांमुळे शिवसेना तसेच ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेला तडा जातोय, असे शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे यापुढेही सोमय्या हे शांत होणार नाहीत असे गृहीत धरत शिवसेनेने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने पावलंही उचलली आहेत.