औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत स्थानिक नागरीकांनी केलेल्या मागण्यांचे निवेदन आज शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना नवी दिल्ली येथे दिले.
राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) रस्त्याच्या प्रलंबीत मागण्या व चाळीसगाव घाटातील बोगदा होण्यासाठी संघर्ष समितीच्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदनकेंद्रीय मंत्र्याना सुपुर्द करण्यात आले. तसेच औरंगाबाद – चाळीसगाव रेल्वे विभागासोबत संयुक्तपणे रेल्वे लाईनचे काम करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची विनंती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) अंतर्गत औट्रम घाटातील बोगदा कुठल्याही परिस्थितीत होणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या शिष्टमंडळाला दिली. या बोगद्याला पाच हजार कोटीचा खर्च असल्याने रद्द झाल्याचे चुकीच्या बातम्या पसरविण्यात आल्या.
मात्र, या खर्चा मध्ये थोडीफार कपात करुन मराठवाडा खांन्देश उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या बोगद्याचे महत्व लक्षात घेता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी गेल्या दहा वर्षापासुन राष्ट्रिय महामार्ग २११ संसदेत, लोकसभेत अनेकदा प्रश्न उपस्थित करुन जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपुत, संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके आदींची उपस्थिती होती.