मागील काही दिवसांपासून शिवसेनेत जोरदार इनकमींग सुरु आहे. भाजपचे काही नेते आणि नगरसेवक भाजपला घरचा अहेर देत शिवसेनेत प्रवेश करतायत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहेत. या पार्श्वभूमिवर नगरसेवकांचे पक्षाला असे सोडून जाणे भाजपच्या चांगलेच जिव्हारी लागत आहे. मुंबई परिसरातील जवाबदारी हे पक्षातील जेष्ठ नेते आशिष शेलार यांचेकडे आहे. तेव्हा त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता, सावरसावरी करण्याचा प्रयत्न आशिष शेलारांनी केला. सोबतच कडक शब्दात त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
“शिवसेनेस आमच्या ताटातले ऊरलेले खरकटे खायची सवय आहे, हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले आहे” असे आशिष शेलार यावेळी म्हणाले. आशिष शेलारांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. परंतू अद्याप शिवसेनेकडून यास कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. “ज्यांना पक्षातून टिकीटासाठी नाकारलं जाऊ शकतं असेच पक्षातून बाहेर पडतायत. टिकीटाच्या लालसेने हे लोकं शिवसेनेत जातायत” असेसुद्धा आशिष शेलार यावेळी म्हणाले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर शिवसेने मुंबईत मोर्चेबांधणी करते आहे. यादरम्यान भाजपातील काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. काही दिवसांअगोदरच भाजपचे माजी आ. कृष्णा हेगडे आणि माजी आ. हेमेंद्र गुप्ता यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा सपाटाच लावला आहे. भाजपचे दोन मोठे नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्यामुळे त्यांच्या भागात यावेळेस शिवसेनेस फायदा होण्याची शक्यता आहे.
केंद्रिय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांचा नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाकरिता महाराष्ट्र दौरा होता. हा दौरा आटोपताच नितेश राणे यांच्या मतदारसंघातील सात नगरसेवकांनी एकाचवेळी भाजपचा राजिनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा नितेश राणे यांनीसुद्धा यावेळी सावरासावरी करत शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेनेला याठिकाणी ऊमेदवार ऊभा करण्यासाठीसुद्धा कुणी शिवसैनिक उरलेला नाही त्यामुळे आम्हाला शिवसेनेची कीव आली आणि अाम्हीच त्यांना शिवसेनेत पाठवले अशी टीका त्यांनी केली होती.
राष्ट्रवादी परिवार संवाद या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमादरम्यासुद्धा राष्ट्रवादीला सोडून गेलेले भाजपातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी स्वगृही वापसी करते आहे. आशिष शेलारांची ही विखारी टीका म्हणजे नगरसेवक जाण्यामुळे भाजपचे चीडचीड होते आहे ही दाखवणारी आहे. येणार्या काळात शिवसेनेस या ईनकमींगचा किती फायदा होणार आणि भाजपला किती नुकसान सोसावे लागणार याबद्दल राजकीय वर्तुळात ऊत्सुकता लागलेली आहे.