शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काही परदेशी सेलीब्रीटींनी ट्वीट केले होते. यामध्ये जागतीक पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रीटा थनबर्गचासुद्धा समावेश होता. त्यानंतर मात्र ग्रीटा थनबर्गविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयअार दाखल केला होता. ग्रीटा थनबर्ग टुलकीट प्रसारीत करुन आंदोलनासंदर्भात चुकीची माहिती पसरवते आहे, या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी तीच्यावर एफआयआर दाखल केला होता. यानंतर मात्र भारतातील काही नावे यासंदर्भात पुढे आली. पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी, वकील निकिता जेकब आणि मुळचा बीडमधील तरुण शंतनु मुळुक यांचे नाव टुलकीट प्रकरणात संशयीत म्हणून समोर आले आहे. तीघांवरही गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यानच बीड येथील शंतनू मुळुक हा शिवसेना नेत्याचा भाऊ आहे आणि यावरुनच राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी एक व्हिडिअो ट्वीट करत भारताला बदनाम करु ईच्छिणार्या विदेशी षडयंत्रात शिवसेनेचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. शंतनू मुळुक हा जागतील पातळीवरील पर्यावरणवादी कार्यकर्ता आहे. शेतकरिक आंदोलनासंदर्भात गैरसमज पसरवणार्या टिलकीट निर्मीतीत शंतनुचासुद्धा समावेश असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणने आहे. शंतनू मुळुक हा बीड जिल्ह्यातील शिवसेना नेत्याचा चुलत भाऊ आहे. यावरुनच राम कदम यांनी थेट विदेशींच्या कारस्थानांमध्ये शिवसेना सामील असल्याचे आरोप केले आहे.
“शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. देशहीताच्या गोष्टी करणारी शिवसेना कधीच संपली आहे. सध्याची शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झालेली शिवसेना आहे.” असे ते आपल्या व्हिडिअोत म्हणाले आहेत टुलकीट प्रकरणी संशयीत असणार्या दिशा रवी या तरुणीस दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. दरम्यान निकिता जेकब हीने मुंबई ऊच्च न्यायालयात तर शंतनूने अौरंगाबाद खंडपीठात ट्रान्झिट अटकपुर्व जामिनासाठी याचीका दाखल केली आहे.