केंद्रिय गृहमंत्री अमित शहा दि. ७ फेबृवारीला महाराष्ट्र दौर्यावर होते. नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऊद्घाटनासाठी ते आले होते. नारायण राणे यांनी अमित शहांच्या पायगुणामुळे महाविकासआघाडीचे सरकार जावे असे वक्तव्य करत त्याची पार्श्वभूमि निर्माण केली होती. यानंतर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान अमित शहा यांनी शिवसेनेवर चांगलीच टीका केली. राज्यातील सरकारची तुलना तीनचाकी अॉटोरिक्षाशी करत त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. अमित शहांच्या या टीकेनंतर शिवसेना यास काय प्रत्युत्तर देणार याचीसुद्धा राजकीय वातावरणारत चर्चा रंगली होती. यावरच शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमित शहांच्या टीकेस प्रत्युत्तर दिले आहे.
अमित शहा यांनी यावेळी नारायण राणेंचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडनुकांनंतर भाजप-सेना युतीत मुख्यमंत्रीपदावरुन वाद निर्माण झाला होता. यावेळी विविध चर्चांना ऊधाण आले होते. यावेळीच अमित शहा यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाल्याचे शिवसेनेच्यावतीने बोलले जात होते. परंतू अमित शहा यांनी यावरील बोलतांना म्हटले,”आम्ही बंद खोलीत चर्चा करत नाही, आम्ही थेट खुलेआम आव्हान देत असतो. जनतेचा अनादर आम्ही नाही तर तुम्हीच केला आहे. सोबतच आमच्याशी दगाबाजीसुद्धा केली आहे. शिवसेना खालच्या पातळीचे राजकारण करते आहे. आम्ही या पातळीवर ऊतरल्यास महाराष्ट्रात शिवसेना केव्हाच संपली असती.” असे अमित शहा यावेळी म्हणाले.
बाळासाहेबांच्या तत्वांना तीलांजली देत सत्तेसाठी शिवसेना लाचार झाली आहे. असेदेखील ते यावेळी म्हणाले. राज्यातील सरकारची तुलना त्यांनी तीनचाकी अॉटोरिक्षाशी करत या रीक्षाचे तीनही चाक वेगवेगळ्या दिशांना जात असल्याचेदेखील शहा यावेळी बोलले.
शिवसेनेवरील टीकेस खरमरीत आणि शिवसेना स्टाईलने प्रत्युत्तर देण्यास संजय राऊत नेहमिच अग्रेसर असतात. अमित शहांच्या टीकेससुद्धा संजय राऊत यंनी ऊत्तर दिले आहे. शिवसेना संपल्याचे भाकीतं करणार्यांच्या नावांचा ऊल्लेख करत शिवसेना कधीच संपणार नाही असे ट्वीट संजय राऊत यंनी केले आहे.
‘सन १९७५ मध्ये रजनी पटेल यांनी आणि ९० दशकात मला वाटतं की मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. पुन्हा सन २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असेच म्हटले होते आणि दोन्ही वेळेस शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली! जय महाराष्ट्र.’ अशा आशयाचे ट्वीट करत संजय राऊत यांनी शिवसेनेवरील टीकेस ऊत्तर दिले आहे.