शिवसेनेचा भाजपला जोरका झटका, मात्तबर नेते करणार शिवसेनेत प्रवेश

1911

भाजपला एकामागोमाग एक झटके बसत आहेत. भाजपमध्ये झालेली मेगाभरती आता थांबली आहे. आणि सोबतच गळती सुरु झाल्याचं दिसून येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या अनेक समर्थक नेत्यांनी भाजप सोडलं होतं.

आता शिवसेनेने भाजपला जोरका झटका दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेतील तीन नागरसेवकानी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधण्याचं निश्चित केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते हे तीन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

हे नवी मुंबईतील तीन नगरसेवक भाजपचे माजी मंत्री, आमदार गणेश नाईक यांचे समर्थक मानले जातात. मात्र, त्यांच्या जाण्याने भाजपसह गणेश नाईकांना नवी मुंबईत मोठं नुकसान होणार आहे. याबाबत टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.