अन म्हणून आपापसातील मतभेद मिटवून टाकावेत:शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे शिवसैनिकांना आवाहन

150

सध्या होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका, आगामी काळातील नगर पंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीत यश मिळवण्याच्या निर्धाराने लातूर जिल्ह्यात मजबूत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करावी. आपसातील मतभेद मिटवून टाकावेत, असे अवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. 

शिवसेना राज्यात महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे जर कोणी भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.ज्या गावात शिवसेनेचा सरपंच होईल त्या गावात निधी उपलब्ध करून देण्याचे मी वचन देतो असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

लवकरच शिवसेनेचा लातूर शहरात महिला मेळावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मजबूत संघटनात्मक बांधणी करा, शिवसेनेचा पुढील मेळावा हा औसा आणि निलंगा येथे घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.. लातूर येथील पत्रकार भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते .