मुंबई महानगरपालिकेबाबत शिवसेनेचा ‘हा’ आहे महत्वाचा निर्णय

15

कोरोना संकट काळात आणि लॉकडॉऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटकाही बसला आहे.मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी पालिका विशेष निधी उभारणार आहे. यासाठी 5,876 कोटींचे अंतर्गत कर्ज घेतले जाईल अशी माहिती पालिकेने दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक रकमेचे बजेट मांडले.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पालिकेत वार्षिक बजेट सादर करण्यात आले.

आरोग्य विभागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी 822 कोटी रुपयांची तरतूद तर रुग्णालयांच्या बांधकामासाठी 1206 कोटी रुपये देण्यात आले आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग शाळांचे रुपांतर नर्सिंग कॉलेजमध्ये होणार आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

‘बेस्ट’ प्राधिकरणासाठी महानगरपालिका 750 कोटी रुपयांची मदत करणार. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत ग्रॅच्यूएटी 406 कोटी रुपयांचे कर्ज महापालिका बेस्टला देणार.मुंबई महानगरपालिकेने 2,945 कोटी रुपयांचे शैक्षणिक बजेटही सादर केले. या बजेटमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

विकास कामांना मार्गी लावण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 1675 कोटी अंदाजे खर्च असलेल्या पुलांचे कामही यंदा मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसंच जलवाहन बोगद्यांसाठी 399 कोटी रुपये तर मिठी नदी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी 67 कोटी रुपये देण्यात आले आहे.