नागपूर ते रायगड सायकलने प्रवास करणार्‍या शिवभक्तांचा कारंजात शिवप्रेमींकडून सत्कार

37

नागपूर येथील धाडस गृपच्यावतीने नागपुर ते रायगड सायकल मोहीम काढण्यात आली आहे. नागपूरहून निघालेले धाडस गृपचे शिवभक्त सोमवरी वाशिम जिल्ह्यातील कारंजा याठिकाणी पोहचले. धाडस गृपच्या या मोहीमेचे कौतुक करत कारंजातील शिवप्रेमींनी धाडस गृपच्या या शिवभक्तांचा सत्कार केला आहे. तसेच कारंजाचे आ. राजेंद्र पाटणी आणि भाजप शहरअध्यक्ष ललीत चांडक यांनी मोहीमवीरांच्या विश्रामाची व्यवस्था येथील गुरुकृपा हॉटेल याठिकाणी केली होती.

धाडस गृपच्यावतीने सायकलने प्रवास करत किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. सायकलने प्रवास करत असतांना जागोजागी शिवविचारांचा प्रसार या गृपतर्फे केला जातो. तरुणाईच्या या आगळ्यावेगळ्या ऊपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

धाडस गृप यानंतरसुद्धा अशा अनेक मोहीमांचे अयोजन करणार असल्याचे ऊपस्थित शिवप्रेमींनी यावेळी सांगीतले. या मोहीमेसाठी रायगड किल्ल्याची निवड केली असून त्यांनी नागपूरवरुन प्रवास सुरु केला. कारंजात दाखल होताच त्यांचे स्वागत करुन त्यांच्या धाडसाचे कौतुक करत या शिवभक्तांचा सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा कारंजा आणि भाजप युवा मोेर्चा कारंजा आणि कारंजातील तमाम शिवप्रेमींनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रसाद देशमुख यांनी केले. ललित चांडक भाजपा, संदीप गढवाले, विजय पाटीl,बंटी डेन्डुळे, आशिष तांबोळकर, शशी वेळूळकर, अखिलेश बोरकर. ललित तिवारी,गौरव साखरकर, कु नेहा लोखंडे ,कु साक्षी पापळकर,कु इशा मांडवगडे, ओम शेलवनटे ,प्रशांत राठोड,आनंद मापारी, रितेश चोकशे ,श्याम नायसे, सचीन काळे,प्रवीण धारस्कर, तेजपाल सिंग भाटिया आदींची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.