दरवर्षी १९ फेबृवारीस राज्यभरात मोठ्या ऊत्साहात शिवजयंती साजती केली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्य सरकारने शिवजयंतीवर काही निर्बंध आणले आहे. परंतू आता कोरोनाचा वेग अोसरत असल्याचे चित्र असतांना राज्य सरकारच्या शिवजयंतीवर आणलेल्या निर्बंधांवरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकाआघाडी सरकारवर भाजप नेते जोरदार टीका करत आहे. भाजपचे अामदार राम कदम यांनी थेट ऊद्धव ठाकरेंना पत्र लिहून निर्बंध न हटवल्यास आंदोलन करण्याचासुद्धा ईशारा दिला होता. आता या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपास चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
सचिन सावंत यांनी ट्वीट करत भाजपावर निशाना साधला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांबरोबर करणार्या, शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणार्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपाने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. करोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये. असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच “शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच महाविकासआघाडी सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही.” असा टोलासुद्धा सावंत यांनी भाजपाला लगावला आहे
“शिवजयंतीवर निर्बध लावणे म्हणजे हे हिंदूविरोधी कृत्य आहे. महाविकासआघाडी सरकार हिंदूविरोधी भूमिका घेत असते.” अशी टीका भाजपाकडून होत असते. तसेच शिवजयंतीवरील निर्बंधावरुनसुद्धा भाजपने शिवसेनेवर टकेची झोड ऊडवली आहे. सचिन सावंत यांनी पुढे येत मात्र भाजपांस ऊत्तर दिले आहे.
राज्य सरकारने आणि भाजपच्या या वादानंतर राज्य सरकारने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. आधी फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आता १०० जणांना परवानगी देण्यात आली आहे.