देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. त्यात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यातील कोरोनाच्या संसर्ग साखळीला तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर अनके कलाकारांनी सुट्टी घालसण्यासाठी मालदीवला जाणे पसंद केले होते. याच वरून अनेकांनी कलाकारांना खडेबोल सुनावले होते.
त्या पाठोपाठ आता लेखिका शोभा डे यांनी कलाकारांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे, शोभा डे यांनी कलाकारांवर रागवत एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की,’कलाकारांनी आपले फोटो पोस्ट करणं चुकीचं आहे. तुम्ही भाग्यवान आहात, या परिस्थितीतही तुम्हाला एवढा चांगला ब्रेक मिळू शकतो. पण सगळ्यांवर एक मेहरबानी करा आणि तुमचे फोटो खासगी ठेवा असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘कलाकार सुट्टया घालवत आहेत. आणि फोटोजेनिक एटॉलवर जगत आहेत. अशा परिस्थितीत असंवेदनशील राहण्यासारखं आहे. भारतात जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रत्येकजण आपला पैसा आणि आपला वेळ म्हणत या गोष्टी करत आहेत. प्रत्येक जण काय सोनू सूद नसतं?’ असं म्हणत त्यांनी सोनू सूदच्या कार्याची दखल घेण्यास त्या कलाकारांना भाग पडले आहे.
रणबीर कपूर, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित आणि दीया मिर्झाबद्दल शोभा डे लिहितात की, आपण का कारण शोधायचं? एवढा मोठा हा काही अपराध नाही. बस करा आता. जे कलाकार मोठ्या घरात राहतात, मास्क घालण्याचे सल्ले देतात. ते आता सनकिस्ड शॉट पोस्ट करत आहे. दीया मिर्झा लकी आहे. तिच्या बेबी बंपवर ‘ओ’ करणारे चाहते आहेत. असा टोला त्यांनी लगावला आहे.