काँग्रेसला झटका : ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

242

अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेली जिल्हा बॅंक आता शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

यावेळी मुंबई वर्षा निवासस्थानी येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रवेशाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्तार नितीन पाटील यांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील होते.