पालिकेत प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला मोठा झटका बसतोय. कारण पालिकेचे विरोधीपक्षनेतेच राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे.उद्या मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याची माहिती स्वत: महेश कोठे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे पक्षातर्फे कोठे यांना डावलून मानेंना विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली. पक्षावर नाराज असलेल्या कोठेंनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक देखील लढवली. मात्र त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही.
विधानसभेच्या जागेवर माझा हक्क होता. मात्र मला संधी न देऊन डावलण्यात आलं. तेव्हापासून मी नाराज होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी भेटण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र मधल्या काही लोकांनी भेट देखील होऊ दिली नाही. मी राष्ट्रवादीत जरी प्रयत्न करत असलो, तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहोत. अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलाताना महेश कोठे यांनी दिली.