धक्कादायक! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याने केली गळफास घेऊन आत्महत्या

5

दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तवने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूतून चाहते सावरे पर्यंत या अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात पुन्हा खळबळ उडाली आहे.

श्रीवास्तव चंद्रशेख असे आत्महत्या केलेल्या अभिनेत्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह बुधवारी घरात लटकलेला अवस्थेत आढळून आला. चंद्रशेखरच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चंद्रशेखर श्रीवास्तवने वल्लमई थारायो या वेबसिरीज मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

श्रीवास्तव चंद्रशेखर हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. मात्र, असे म्हटले जाते की, चंद्रशेखर गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात होता. दरम्यान, 22 जानेवारी 2021ला कन्नड अभिनेत्री जयश्री रामय्या हिने आत्महत्या केली होती. तिने गेल्या वर्षी जूनमध्ये सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याची पोस्ट फेसबूकवर अपलोड केली होती. नैराश्येतून बाहेर येत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे तिने म्हटले होते.