धक्कादायक! अंबानी स्फोटक प्रकरणातील ती दुसरी ईनोव्हा कार तर पोलिसांचीच!

35

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक पदार्थांने भरलेल्या अवस्थेतील एक स्कॉर्पीअो कार निर्जन अवस्थेत आढळली होती. परंतू या प्रकरणात एज ईनोव्हा कारसुद्धा सहभागी होती, जिचा नंबर बनावट होता. पोलिस या ईनोव्हा कारच्या शोधात होते. अखेर ती कार सापडली असून ती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचीच असल्याची माहिती समोर आली. यामुळे तपास अधिकार्‍यांना एकप्रकारे धक्काच बसला आहे.

२५ फेबृवारीच्या रात्री मुकेश अंबानी यांच्या मंबईतील एंटेलिना निवासस्थानासमोर एक स्कॉर्पीअो पार्क करण्यात आली होती. या गाडीमध्ये अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या आणि त्यानंतर अंबानी यांना धमक्यासुद्धा आल्या होत्या. स्कॉर्पीअो गाडी पार्क करणारा व्यक्ती त्याठिकाणी आलेल्या ईनोव्हा कारने त्याठिकाणाहून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर या ईनोव्हा कारचा शोध घेतला जात होता. अखेर एनआयएला ही कार सापडली आहे. काल रात्री ती एनआयएच्या कार्यालयात ती कार आणण्यात आली आहे.

एनआयए आणि एटीेएस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. स्कॉर्पीअो गाडीचे मालक असणारे मनसुख हिरेन यांची हत्येप्रकरणी संशयित असणारे क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने ताब्यात घेतले आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर अनेक नाव पुढे येणार असल्याची माहिती सुत्रांकडून दिली गेली आहे.

त्यारात्रीच्या त्या पांढर्‍या ईनोव्हाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही फुटेज आणि ३० जवाब नोंदवून घेतले आहे. तरिदेखील मात्र या ईनोव्हाचा पत्ता लागला नव्हता. अखेर एनआयएने ही कार ताब्यात घेतली असून मुंबई पोलिसांची ती कार असल्ताचा दावा केला आहे. आता याप्रकरणाला पुढे काय वलण लागते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागेलेले आहे.