लग्न हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण असतो. पण लग्न होत नसेल तर मोठं नैराश्य येण्याची शक्यता असते. अशाच एका तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावात ही दुःखद घटना घडली. पोलीस ठाण्यात सदरील प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती आहे.
योगेश सूर्याजी मगर वय 44 असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. योगेश मगर हा त्याच्या आईसोबत नागठाणे गावात राहत होता. गावातील एक दुकान भाड्याने घेऊन टेलरिंग व्यवसाय सुरु केला होता व तो त्याच दुकानातच झोपण्यासाठी जात असे.
योगेशचे वय वाढत होतं पण, लग्न होत नव्हतं. त्यामुळे गेल्या अनेक काळापासून तो नैराश्यात होता. त्याचं नैराश्यातून त्याने आत्महत्येच पाऊल उचलले आहे.
शनिवारी योगेश घरी न आल्याने त्याची आई रात्री उशिरा दुकानात गेली. त्यांनी दुकानाचे शटर उघडून बघितले असता योगेशने त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर पोलिसांना बोलावले आता. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.